या कार्यक्रमात भारतातील आघाडीच्या छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यातून वडील-मुलींच्या हृदयस्पर्शी क्षणांचे टिपण झाले असून, प्रोजेक्ट नन्ही कलीअंतर्गत ७०० हून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्यात आला आहे. मुंबई : प्रोजेक्ट नन्ही कलीतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा निधी संकलन उपक्रम ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ याचे दहावे सत्र 13 आणि 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब […]
मुंबई | प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. ही कारवाई शिल्पा शेट्टी यांच्या ‘बेस्टियन हॉस्पिटॅलिटी’ (Bastian Hospitality) या कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टी या या कंपनीच्या को-ओनर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टियन हॉस्पिटॅलिटी कंपनीचे मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि गोवा येथे ‘बेस्टियन’ (Bastian) […]
प्रवीण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी, प्रगतीचे प्रतीक. मात्र याच शहरात दररोज मुलींच्या अपहरणाच्या, बेपत्ता होण्याच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असताना एक गंभीर प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष गप्प का आहेत? हे मौन केवळ दुर्लक्षाचे नाही, तर राजकीय इच्छाशक्तीच्या अपयशाचे ठळक लक्षण आहे. महिलांची […]
नवी दिल्ली / पटना बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन (Nitin Nabin) यांची भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष (National Executive President / Working President) म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबत अधिकृत पत्र जारी केले असून ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजप नेतृत्वाचा नितीन […]
गायिका कविता उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार 19 व्या मोहम्मद रफी पुरस्काराची मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्याकडून घोषणा २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वा. मान्यवरांच्या हस्ते वितरण मुंबई दि. 15 डिसेंबर 2025 : हिंदीमधील अजरामर गाण्यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्थान निर्माण करणा-या ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना मरणोत्तर यावर्षीचा […]
जवळपास सहा दशके आपल्या सुसंकृत राजकारणाने जनसेवा करणारे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर आज वरवंटी (ता. लातूर) येथे शासकीय इतमामात, मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलीस दलाच्या […]
नागपूर, दि. ११ : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या […]
~ एथरच्या एकूण विक्रीमध्ये रिझ्टाचे योगदान 70%पेक्षा जास्त एथर एनर्जी या भारतातील एका आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकाने आज जाहीर केले की, रिझ्टा या त्यांच्या फॅमिली स्कूटरने 2 लाख स्कूटर विक्रीचा टप्पा पार केला आहे. मे 2025 मध्ये 1 लाख रिझ्टा गाड्या विकल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत 2 लाखांचा टप्पा एथरने पार केला आहे. यावरून देशभरात रिझ्टाची […]
महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ आणि असंघटित कामगार संघटनांचे प्रणेते बाबा आढाव यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. देशभरातील हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, काच–पत्रा वेचक कामगार, तसेच विविध असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारधारेवर उभे राहून समाजातील तळागाळातील […]
मुंबई, दि. ८ डिसेंबर. असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या […]
