Thane | मुरबाडच्या ग्रामीण भागातून घडले ११ शासकीय अधिकारी; जिजाऊ संस्थेच्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा

सोनावले, ता. मुरबाड, जि. ठाणे येथे जिजाऊ मोफत MPSC/UPSC वाचनालय व मोफत पोलीस अकॅडमी, घसई यांच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या ११ यशस्वी विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थित होते.

मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड, BMC तसेच विविध शासकीय विभागांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींचा यावेळी गौरव करण्यात आला. सामान्य आणि ग्रामीण कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

Nilesh Sambare Jijau Sanstha
Nilesh Sambare Jijau Sanstha

विशेष म्हणजे, मुरबाड तालुक्यातून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 150 पेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले असून, हा संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचे मोठे कार्य निलेश सांबरे सातत्याने करत आहेत.

 

उपस्थित ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “पूर्वी आमच्या भागातील मुलांना सरकारी नोकरी म्हणजे फक्त स्वप्न वाटायचे. पण निलेशजी सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून हजारो युवकांच्या मनात मोठी स्वप्ने निर्माण केली. आज आमच्या गावातील मुलं-मुली पोलीस, फायर ब्रिगेड आणि इतर शासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत, हे त्यांच्या कार्याचे मोठे यश आहे.”

Nilesh Sambare Jijau Sanstha
Nilesh Sambare Jijau Sanstha

यावेळी ग्रामस्थांनी निलेश सांबरे जल्लोषात स्वागत करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास विविध मान्यवर, जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, उत्साहपूर्ण आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *