लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड २०२६ ने मा.खा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा भव्य गौरव

मुंबई (विशेष प्रतिनिधी):

भारतीय चित्रपटसृष्टीत विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आयोजित भव्य सोहळ्यात यंदाचा लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड २०२६ लातूरचे लोकप्रिय माजी खासदार, संसदरत्न, प्राध्यापक, विधिज्ञ आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.

मुंबईतील रहेजा क्लासिक क्लब येथे डॉ कृष्णा चौहाण फाउंडेशन च्या वतीने हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात भजनसम्राट अनुप जलोटा आणि प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *