कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित- हिरामण कोकाटे पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) कोकण पदवीधर मतदार संघासाठी दि.26 जून रोजी मतदान पार पडले. एकूण 13 उमेदवार या निवडणुकीत निवडणूक रिंगणात उभे होते. कोकणात होत असलेल्या या निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासारखा जागरूक, सक्रिय, लोकाभिमुख आणि विकासदृष्टी असलेला उमेदवार पदवीधर निवडणुकीच्या लढतीत आहे.त्यामुळे […]
रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड एज्यूकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज याची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी आय क्यू ये सी. चे समन्वयक डॉ. एम. ए. बडगुजर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, भागवत धर्माच्या झेंड्याखाली निरनिराळ्या जातीजमातींना एकत्र आणण्याचे महान कार्य […]
ॲड. सोनिया गजभिये यांच्या प्रयत्नांना यश नागपूर दि. २५/६ : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आता २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय गर्भपात करण्याच्या मानक मार्गदर्शक कार्यपद्धतीस (एसओपी) राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य शासनाने हायकोर्टाला मागील सुनावणीत दिली होती. पीडितेने दाखल केलेल्या याचिकेवर राज्य शासनाने एसओपी आरोग्य विभागासह इतर सर्व संबंधित विभागांना पाठविली नसल्याचे […]
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख […]
धावरवाडी (चौरे ) प्रतिनिधी श्रीकांत जाधव उन्हाळी सुट्ट्या संपल्या की जून महिन्यात शाळा सुरू होतात. त्याचबरोबर नव्याने वर्ग बदलले की वह्या,पुस्तके,दफ्तर अशा विविध समग्रिणा पालकांच्या खिशाला कात्री ही बसत असते. त्यातच सुगीच्या हंगामात शेतीच्या बी बियाणे, खते यासाठी ही शेतकरी वर्गाला सामोरे हे जावे लागत असते. त्याच बरोबर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण हाही […]
स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा सत्कोंडी येथे शुभारंभ रायगड- धम्मशील सावंत ज्ञानदीप सार्वजनिक वाचणालय सत्कोंडी येथे नुकतेच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करिअर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी जे.एस.डब्यु एनर्जीचे श्री अनिल दधिच म्हणाले, सत्कोंडी गाव हे एक एकसंघ गाव आहे. […]
रायगड/धम्मशील सावंत जागृती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून संस्थेच्या कामावर प्रभावित होत अनेक तरुण संस्थे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात ,जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी नुकतीच पडघे येथील सामाजिक कामाची आवड असलेल्या होतकरू तरुण कुवर पाटील याची तळोजा विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. जागृती फाऊंडेशन […]
महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट रायगड (धम्मशील सावंत )- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करून देशभर पोहोचविण्याचे काम मी करीत आहे. देशभरात राष्ट्रीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष मजबूत राजकीय मान्यताप्राप्त पक्ष करण्याचा आपला निर्धार आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष साकार करणे हीच डॉ बाबासाहेब […]
पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) अलिबाग तालुक्यातील चौल येथील शैलेश राईलकर पर्यावरण स्नेही (इकोफ्रेंडली) जीवन पद्धती जगत आहेत. त्यांनी प्रयोग व शोध याद्वारे विविध इकोफ्रेंडली वस्तू तयार केल्या आहेत. तसेच प्लास्टिकला पर्याय दिला आहे. नुकतेच त्यांनी केळीच्या झाडापासून दोर बनवले आहेत. तसेच डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय देऊन जणू राखाडीची डास्टबिन बॅग बनवली आहे. […]
नाणेगाव येथे केंद्रस्तर स्पर्धा परीक्षा नवोपक्रमाचे उदघाटन. नानेगाव ,,(पाटण ) श्रीकांत जाधव सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे, यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी नाणेगाव केंद्रास्तरावर राबविण्यात आलेला ‘नाणेगाव पॅटर्न’ हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रप्रमुख अर्जुन पाटील यांनी केले. नाणेगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख दादासाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तर स्पर्धा […]
