मोदी सरकारच्या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा: सौ.वैशाली ताई मांढरे (कुलदीप मोहिते, उंब्रज कराड)

मोदी सरकारच्या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा:
सौ.वैशाली ताई मांढरे

(कुलदीप मोहिते, उंब्रज कराड)

दि. १७ उंब्रज :चलो अभियान उंब्रज या ठिकाणी राबविण्यात आले. या अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते व पदाधिकारी यांनी भेट देऊन समाजातील असंघटित आणि मागास गोसावी समाजाची पडताळणी केली. गरीब कुटुंबाच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्याचे निवारणही करण्यात आले.तसेच मोदी सरकारने जनकल्याणासाठी अमलात आणलेल्या योजनांची त्यांना माहिती त्यांना देण्यात आली.तसेच या योजनांचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहचल्या कि नाही याचाही आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला.महिलांना जिल्हाअध्यक्ष यांनी स्वतः उज्वला योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का याची ही चौकशी केली. मुलीची भेट घेऊन त्यांनाही सरकारने त्यांचे शिक्षण कसे मोफत करण्यात आले ते ही सांगितले. काही वृद्धा लोकांच्या गाठी घेतल्या काही तरुण मंडळीनच्या गाठी घेतल्या त्यांनाही व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्यात आले त्यानंतर जवळच्या मंदिरामद्ये सर्व लोक एकत्र आले असताना कराड उत्तरच्या महिला मोर्चा उपाध्यक्ष सौं वैशालीताई मांढरे यांनी बऱ्याच योजनाची माहिती दिली. त्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली .प्रत्येक योजना त्यांना खोलवर समजाऊन सांगितल्या त्यांनी भाषणात हे ही सांगितले कि योजना सकाळी उठल्या पासून ते झोपेपर्यंत व लहान मुलापासून ते वृद्धाप्नापर्यंत च्या योजना मोदींनी आणलेत पण आजून त्या योजना तळागाळापर्यंत न पोचल्यामुळे सर्व लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही.आणि तो लाभ लोकांपर्यंत पोचवा त्या योजना गोरगरीबनपर्यंत पोचाव्या म्हणूनच आम्ही हे घर चलो अभियान सुरु केले आहे आणि ज्या वेळी प्रत्येक योजना प्रत्येक घरात पोचेल तेव्हाच माझा भारत देश खऱ्या अर्थाने श्रीमंत झाला असेल असेही त्या त्या ठिकाणी म्हणाल्या त्यांनी असेही सांगितले कि मोदीजींचं स्वप्न आहे कि माझ्या देशातील महिला सक्षम झाली पाहिजे. तिने शिकले पाहिजे तिने चुलीवर स्वयंपाक न करता तिने गॅस वरच स्वयंपाक बनविला पाहिजे. एकही महिला गॅस पासून वंचित राहता कामा नये. तिचे कष्ट कमी झाले पाहिजेत तरुण मंडळींना ही सांगण्यात आलेकी विश्वकर्मा सारख्या योजनाचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात वाढ करा बांधकाम कामगारांनाही योजना आपल्या मोदीसरकारने दिली आहे.त्याचाही लाभ त्यांनी नक्की घ्यावा. आभा कार्ड काढा आयुष्मान सारख्या योजनेसाठी कार्ड काढणे इ श्रम कार्ड काढणे, श्रावण बाळ योजना, निराधार योजना, अशा भरपूर योजनाचा लाभ घेण्यासाठी सर्वांना विनंती केली. त्या योजना सांगत असतांना भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय धैर्यशील दादा कदम , तालुका अध्यक्ष शंकरारावं शेजवळ, दिव्यांग कमिटीचे जिल्हाध्यक्ष दीपक खडंग, गोसावी सामाज्याचे जिलाध्यक्ष विलासराव आटोळे आदी मन्यावर उपस्थित होते अशाप्रकारे मोलाचे मार्गदर्शन वैशालीताई यांनी त्या ठिकाणी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *