दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा

शरद पवार मित्राला देणार का साथ ..?

मिलिंद लोहार कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज

सातारा साताऱ्यात आज चाणक्याचे आगमन झाल्याने भल्या भल्यांना घाम फुटला असावा कारण तसेच आहे लोकसभा निवडणूक चाचपणी मात्र साठ वर्षाच्या जिवाभावाची मैत्रीची चर्चा देखील साताऱ्यात सुरू आहे महाविद्यालयीन चळवळ ते आत्ताचा बंड यामध्ये जवळचे परके होणे आत्ता सर्वच महाराष्ट्रातील जनता पाहत आहे कोणता जवळचा व्यक्ती कधी बंद करून कोणाकडे जाईल याची शाश्वती देणे तसे कठीण मात्र एक असा मित्र ज्याच्यावर घरातील सख्यापेक्षा जास्त विश्वास हाक मारली की आलोच ..म्हणून बारामतीला साताऱ्याची साथ अशी एक समीकरण 2019 साली बघायला मिळाले 2019 साली पावसामध्ये शरद पवार यांची सभा संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली निष्ठा गादीला मत राष्ट्रवादीला श्रीनिवास पाटील यांनी शरद पवार यांच्या शब्दाला खरे ठरवून साताऱ्याच्या  जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवला म्हणूनच पुन्हा एकदा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा….