रायगडात वंचित बहुजन आघाडीचा झंझावत, खारपाले, टाकाची वाडी, केळंबी येथील शेकडो ग्रामस्थांचा जाहीर पक्षप्रवेश

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडी सक्षम आणि बळकट होत आहे. वंचित बहुजन आघाडी युवा च्या वतीने पक्षप्रवेश व शाखेचे उद्घाटन खारपाले , टाकाची वाडी या ठिकाणी करण्यात आले. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे बहुआयामी नेतृत्व आदिवासी समाजाने स्वीकारले आहे.

In Raigad, hundreds of villagers from Kharpale, Takachi Wadi, Kelambi officially joined the Vanchit Bahujan Aghadi.
वंचित बहुजन आघाडीच्या शाखा नामफलकाचे अनावरण आणि पक्षप्रवेश करताना टाकाची वाडी, केळंबी, खारपाले येथील ग्रामस्थ सोबत पदाधिकारी. (छाया: धम्मशील सावंत,पाली बेणसे)

येथील गावचे मुख्य निवासी नारायण हरी वाघमारे व सर्व ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडी युवा मध्ये जाहीर प्रवेश केला. व वंचित बहुजन आघाडीला ताकत देण्याचे काम केले. या कार्यक्रमाला सदस्य मारुती शिंदे, तसेच जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र दिव्यांग सेलचे समन्वयक ऍड: सचिन गायकवाड, पनवेल तालुका अध्यक्ष पुष्पांजली सकपाळ ,पेण तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड, महासचिव प्रदीप गायकवाड, महिला अध्यक्ष पेण तालुका अश्विनी ठाकूर, महासचिव अंकिता शिंदे, दीप्ती यादव , शशिकला गायकवाड, अंकिता जंगम, रेखा सिंग, नरेश गायकवाड, सुनील शिंदे तसेच शाखा कमिटीचे अध्यक्ष विजय गजानन वाघमारे, उपाध्यक्ष संतोष बारके, महासचिव रोशन रोहिदास पवार, सचिव प्रवीण लक्ष्मण नाईक, संघटक बारक्या जनार्दन वाघमारे, सल्लागार भाऊ जनार्दन वाघमारे, सदस्य समीर गणपत नाईक, कैलास गोविंद पवार चंद्रकांत सखाराम वाघमारे आदींसह ग्रामस्थ वंचित बहुजन आघाडीत दाखल झाले.

भारतीय संविधानाने आम्हाला न्याय हक्क आणि अधिकार मिळवून दिले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत.

त्यामुळे आम्ही आंबेडकर घरण्यासोबत एकनिष्ठ राहू, असे नारायण वाघमारे व प्रवेश कर्त्यांनी स्पष्ट केले. आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या समाजाला दिशा दाखवणारे नारायण हरी वाघमारे यांच्यावर विश्वास ठेवून गावचे सर्वांनी वंचित बहुजन आघाडी टाकाची वाडी, केळंबी, खारपाले येथील ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला असल्याचे यावेळी पक्ष प्रवेश कर्त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मारुती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन पेण तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले. शेवटी आभार सचिन कुमार गायकवाड यांनी व्यक्त केले.

Mumbai festival, Mumbai walk

Mumbai Festival I ‘मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’

 

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत सध्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत दि. २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’ चे गेट वे ऑफ इंडिया येथे रात्री ६ ते १० या वेळेत आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील यांची उपस्थित राहणार आहे.

‘मुंबई वॉक’ हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईची गती कायम ठेवणारे खरे हिरो मुंबईचे डबेवाले, पोलिस हवालदार, बेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर, सफाई कामगार, सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झा, शेफ संजीव कुमार, कपिल शर्मा, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. गायक अवधुत गुप्ते, पंकज त्रिपाठी, अमृता फडणवीस यांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

 

Dr. Babasaheb ambedkar marathwada university

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी I Dr. Vijay Fulari

डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्तीराज्यपालांकडून तीन कुलगुरुंची नियुक्ती जाहीर

मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.

डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. राज्यपालांनी नागपूर येथील सी पी ॲण्ड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. राज्यपाल श्री. बैस यांनी डॉ. सुनील गंगाधर भिरुड यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर नियुक्ती केली आहे. डॉ. भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत. सर्व कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत-यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत – करण्यात आली आहे.

Mhasla Press Club I म्हसळा प्रेस क्लबचा पुढाकार, तालुक्यातील पाणी टंचाई बाबत प्रशासनाशी साधला संवाद

म्हसळा – सुशील यादव

तालुक्यातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून जलजीवन योजने अंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च करूनही टंचाई पुर्व कालावधीत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्या नसल्याने नागरीकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

योजना कार्यान्वित करण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि संबंधीत ठेकेदारांकडून नियोजनाचा अभाव आणि हलगर्जीपणा होत असल्याचे ग्रामस्थानी तक्रार अर्ज करून,दैनिक वृत्तपत्रात छापून निदर्शनास आणून दिले असता यावर कायम उपाय योजना व्हावी या उद्देशाने म्हसळा तालुका पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे.

शासकीय अधिकाऱ्यांकडे चर्चा करून तो सोडविण्यासाठी संयुक्तं बैठक घेऊन समन्वय साधला आहे.म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत तालुका तहसीलदार समीर घारे,पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव जाधव,नगर पंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,पाणी पुरवठा अभियंता यशवंत बागकर, माळी,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,प्रेस क्लब अध्यक्ष बाबु शिर्के,सचिव महेश पवार, पत्रकार उदय कळस,अशोक काते,सुशिल यादव,श्रीकांत बीरवाडकर,अंकुश गाणेकर,वैभव कळस आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांनी चर्चेत भाग घेतला होता.

Mhasla press Club
Mhasla press Club

सद्या स्थितीत टंचाई परिस्थिती असलेल्या गावांमध्ये मागणी नुसार टँकरने पाणीपुरवठा करणे हा एकमेव उपाय असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले.म्हसळा तहसीलदार समीर घारे आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे चार ग्रामपंचायती मधील गावांचे प्रस्ताव सादर केले आहेत तर आणखी सहा ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

बैठकीत पत्रकारांनी रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालय म्हसळा आणि पाणी पुरवठा ठेकेदार यांनी योजनेतील चुकीचे कामे केली असल्याचे निदर्शनास आणून दिले असता ती आता पुर्ण होणार नसल्याने म्हसळा तालुक्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.
“हर घर जल ” शासनाच्या ध्येय धोरणानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातुन राज्याच्या महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,खासदार सुनिल तटकरे यांचे विशेष प्रयत्नाने म्हसळा तालुक्यात किमान १०० कोटी रुपयांची तरतूद करून तालुक्यात अनेक गाववाडी वस्तीवर जलजीवन योजने अंतर्गत ६० योजनांना मंजुरी मिळाली आहे. यातील २१ योजना कार्यान्वित झाल्या आहेत तर काही योजनांचे काम कमी अधिक प्रमाणात झाले असल्याचे सांगण्यात आले.

मंजुर योजनेत तांत्रिक त्रुटी,स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडीअडचणी आणि योजना कार्यान्वित करण्यात ठेकेदारांनी दिरंगाई केल्याने म्हसळा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे.टँकर मुक्त म्हसळा तालुक्यात आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ तालुका प्रशासनावर आली आहे.

टँकरने मुक्त असलेल्या म्हसळा तालुक्यात पाणी पुरवठा विभागाचे योग्य समन्वय व नियोजन नसल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीने म्हसळा तहसीलदार समीर घारे,गटविकास अधिकारी श्री जाधव यांच्याकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत.पावसाळा तोंडावर जरी आला असला तरी तो बंगालमध्ये नुकत्याच आलेल्या चक्री वादळाचा परिणाम होऊन लांबणीवर जाणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

पावसाळा सुरू होण्यास बराच वेळ जाणार असल्याने तालुका प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना लागलीच पाणी पुरवठा करावा अशी रास्त मागणी तालुका प्रेस क्लबचे माध्यमातुन करण्यात आली आहे.

रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार

रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार

लातूर-(विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड,लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक विजयकुमार बळीराम गायकवाड यांची सुपुत्री रिया विजयकुमार गायकवाड यांची बफेलो यूनिवर्सिटी ऑनर्स स्टूडेंट काऊन्सिल च्या २४-२५ च्या कालावधी साठी अध्यक्ष म्हणून विजयी होऊन निवड झाल्याबद्दल रिया आणि तिचे आई वडिल पल्लवी आणि विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहारात बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला.

पूज्यनीय भंते पाय्यानंद यांनी रियाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रिया नी आपल्या मनोगत व्यक्त केले.ती म्हणाली की परमपूज्यनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळेच मी अमेरिकेला शिक्षणासाठी जाऊ शकले.माझ्या कुटुंबांनी मला सपोर्ट करुन पाठवले म्हणून हे शक्य झाले.आपण ही आपल्या पाल्याना उच्च शिक्षणासाठी देशात आणि परदेशात पाठवावे असे मत रिया नी व्यक्त केले.

कार्यक्रमाला अखिलभारतीय भिक्कू संघाचे कार्याध्यक्ष पुज्यनीय भंते डॉ उपगुप्त थेरो,पुज्यनीय भंते पाय्यानंद,,पुज्यनीय भिक्कू संघ,पांडुरंग अंबुलगेकर,प्राचार्य डॉ गवई,हजारोच्या संख्येनी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !

 

 

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !

उत्तर अमेरिकेतील ‘आंबेडकराईट असोसिएशनचा’ विशेष पुरस्कार प्रदान !

 

चिपळूण (संदेश पवार यांच्याकडून):

दलित पॅंथरचे सहसंस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कर्तृत्वावर दिनांक 25 मे 2024 रोजी जागतिक मोहर उमटविण्यात आली आहे. नॉर्थ अमेरिकेतील “आंबेडकराईट असोसिएशन ” या संस्थेचा 2024 सालचा विशेष पुरस्कार भारतातील सुप्रसिद्ध लेखक ज. वि. पवार यांना त्यांच्या अनुपस्थितीत देण्यात आला .

 

आंबेडकराईट असोसिएशन ऑफ नोर्थ अमेरिका (AANA ) ही संस्था दरवर्षी सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या एका व्यक्तीस डॉ. आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी ज. वि. पवार यांनी उद्दीपित केलेल्या चळवळीचा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा तसेच समाज उन्नयनासाठी दिलेल्या जगभरातील व्याख्यानांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे . हा पुरस्कार म्हणजे पवार यांनी प्रगल्भित केलेल्या आंबेडकरवादाचा सन्मान आहे. ज.वी. पवार यांनी आंबेडकरवादाची कधीही कास सोडली नाही. उभे आयुष्य त्यांनी केवळ आंबेडकरवादाची जपणूक केली आहे .

 

ज . वी. पवार यांची ग्रंथसंपदा मराठी, हिंदी, इंग्रजी व भारतातील अनेक प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध झाली असून अनेक विद्यापीठातील अभ्यासक त्यांच्या चळवळीवर व साहित्यावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांच्या कवितांचा आणि ग्रंथांचा समावेश अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आजही ते सतत क्रियाशील असून आंबेडकरवादी चळवळीत अत्यंत सक्रिय आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने अपरांत साहित्य कला प्रबोधिनी या साहित्य विषयक संस्थेचा उदय झालेला आहे. त्यांना मिळालेल्या या जागतिक पुरस्काराबद्दल आंबेडकरी चळवळीतून तसेच समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Atul Londhe on Devendra Fadanvis I राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही? : अतुल लोंढे

देवेंद्र फडणविसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्र, राज्यातील जनता व कायद्याचे रक्षकही असुरक्षित

मुंबई – महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री आहेत. पुण्यात दोन तरुणांना कारखाली चिरडून मारले जाते, जळगावातही तसाच प्रकार घडतो आणि आता कायद्याचे रक्षक असलेले तहसिलदार यांच्यावर भरदिवसा हल्ला होतो, गृहविभाग काय करतो, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला द्यावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर हल्लाबोल करताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, इंदापूरच्या तहसिलदारांवर भरदिवसा समाजकंटकांनी हल्ला केला, असे प्रकार सातत्याने होत आहेत. राज्याचा गृहमंत्री जर कणखर असेल तर गुन्हेगारांना चाप बसतो पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारांवर वचक बसण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य वाढल्याचे दिसते.

महाराष्ट्र व राज्यातील जनता फडणवीसांच्या काळात सुरक्षित राहिलेली नाही पण फडणवीस हे फारसे गांभिर्याने घेत नाहीत. “गाडी खाली कुत्रा जरी आली तरी विरोधक राजीनामा मागतात”, असे बेजबाबदार विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. माणसे किड्या मुंग्यासारखी मारली जातात, गाडीखाली चिरडली जातात तरीही गृहमंत्र्यांला त्याचे काहीच वाटत नसेल तर अशा व्यक्तींनी खर्चीवर बसावेच का? फडणवीसांना गृहमंत्रीपद झेपत नाही हे त्यांच्या काळातील घटना पाहून स्पष्ट दिसते पण ते वस्तुस्थिती स्विकारत नाहीत. कायदा सुव्यवस्थेबद्दल गहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारणार, का त्यालाही पंडित जवाहरलाल नेहरुच जबाबदार आहेत, नेहरुच फडणवीसांना काम करु देत नाहीत का? असा खोचक टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला.

Ramkrishna Mission Mumbai I रामकृष्ण मिशन मुंबईच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण

शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

मुंबईतील खार येथील रामकृष्ण मठ व मिशनच्या वर्षभर चाललेल्या शताब्दी वर्षाची सांगता आज बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला रामकृष्ण मिशन बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी दिव्यानंद, सहायक सचिव बलभद्रानंद, मुंबई रामकृष्ण मठाचे अध्यक्ष सत्यदेवानंद, सुशीम दत्ता, शंतनू चौधरी तसेच रामकृष्ण मठाच्या विविध केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ramkrishna mission Mumbai
Ramkrishna mission Mumbai

रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद महिला सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबई केंद्राने गरीब व वंचित महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवून त्यांना आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.

रामकृष्ण मिशन ही आत्मोद्धारासोबत लोकहिताचे सामाजिक कार्य करीत असल्याबद्दल मिशनचे अभिनंदन करून मिशनने भारतातील युवकांसाठी कौशल्य विकास, क्रीडा विकास व समग्र व्यक्तिमत्व विकासासंबंधी उपक्रम राबवावे. तसेच वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सशक्तीकरणाची योजना राबवावी, असे ही त्यांनी सांगितले.

विविध आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांसाठी तसेच त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेले ‘माँ शारदा भवन’ निर्माण केल्याबद्दल मिशनचे कौतुक करून रामकृष्ण मिशनतर्फे ठाणे येथे नवे केंद्र सुरु करण्यात येत असल्याबद्दल राज्यपाल बैस यांनी आनंद व्यक्त केला. (Ramesh Bais, Governor of Maharashtra)

Raigad Caves I सुधागडातील प्राचीन व ऐतिहासिक लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण

 ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज…,

प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या लेण्या्, वास्तू ला इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती

देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण

रायगड (धम्मशील सावंत)

सुधागड तालुक्यात प्राचीन व बहुमूल्य लेण्यांचे समूह आढळतात. येथे ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेणींचा समूह आहे. देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. मागील वर्षी येथील लेण्यांमध्ये अमेरिकेतील भन्ते वेन सुका ध्यानधारणेसाठी आल्या होत्या. तर अनेक देशविदेशातील अभ्यासक दौरे देखील करत असतात. जगभरातील पर्यटकांना भावणार्या या लेण्या स्तूप जतन करण्याची गरज निर्माण झालीय.

सुधागड तालुक्यात प्राचीन व भव्य लेण्यांचे समूह आढळतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन बौद्ध कालीन लेण्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील ठाणाळे, नेणवली, गोमाशी व चांभार लेणी अशा भव्य लेण्यांचा समूह आहे. प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तू इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांच्या पसंतीच्या ठरतात. मात्र त्यांचे सुव्यवस्थित जतन व संगोपन होण्याची अतिशय आवश्यकता आहे.

Raigad caves
Raigad caves

            या प्राचिन लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे फारसे लक्ष नसल्याने त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तू नामशेष होण्याची भिती त्यामुळे त्यांचे जतन व संगोपन होण्याची अतिशय आवश्यकता आहे. दरम्यान

उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण करण्यात येत असल्याने लेणी प्रेमी व पर्यटकात नाराजी दिसून येते.

Raigad caves
Raigad caves

       निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन बौद्ध कालीन लेण्यांची पुरती दुरावस्था झाली आहे. येथिल स्तुप, विहार, चैत्यगृह, शिलालेख स्मारक यांची मोठया प्रमाणात पडझड झाली असुन त्यावर अनेक उपद्रवी लोकांनी चक्क ऑईल पेन्टने नावे लिहीली आहेत. त्यामुळे हि ऐतिहासिक व इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तु नामषेश होण्याची भिती आहे.

Raigad caves
Raigad caves

ठाणाळे लेणी

ठाणाळे लेणी समुहात चैत्यगृह, स्मारक,-स्तुपसमुह, सभागृह व उर्वरित 21 विहार लेणी आहे. बहुतांश विहारांमध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून त्यामध्ये शयनासाठी ओटे आहेत. काही विहारांमध्ये समोरच्या भागात दालन व चार पाच भिक्षुंच्या निवासाची व्यवस्था आहे. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. 5 पायर्‍या असलेल्या एका विहारात वाकाटककालिन रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात. प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके आहे. पाण्याचे हौद, टाके, ब्राम्ही शिलालेख भित्तीचित्र आहेत. या सर्वांची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. बरेच अवशेष भग्नावस्थेत आहेत. अनेक उपद्रवी लोकांनी येथील स्तुप, चैत्यगृह, स्मारक यावर चुन्याने व ऑईल पेन्टने आपली नावे कोरली आहेत. त्यामुळे या एैतिहासिक वास्तुचे सौंदर्य लुप्त झाले आहे. ठाणाळे लेण्यांसारखा ऐंतिहासिक व पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी अशी मागणी पर्यटकप्रेमी व लेणीप्रेमी यांनी केली आहे.

Raigad caves
Raigad caves

      ठाणाळे लेण्यांचा काळ हा इ.स. पुर्व दुसर्‍या शतकापासुन इ.स. 5 व्या शतकापर्यंत आहे. हि लेणी डोंगरामध्ये पश्चिमाभिमुख कोरलेली आहेत. लेण्यात सापडलेल्या विविध वस्तु व मोर्यकालीन चांदीची नाणी पाहाता ही लेणी 2200 वर्षापूर्वीची असल्याचे अनुमान काढण्या येते. लेण्यांचा दगड हा अग्निजन्य (बेसाल्ट) दगड आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अप्रतीम असलेल्या तसेच मानवी जिवनाच्या आर्थिक जडणघडणीत या लेण्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हि लेणी समुद्र किनार्‍यावरुन चौल-धरमतर-नागोठणे खाडीमार्गे देशावर जाणारी व्यापारी केंद्रे होती असे म्हटले जाते. वाघजाई, घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्गही या लेण्यांजवळुन जातो. यामुळे ही लेणी चौल बंदराच्या सानिध्याने खोदली गेली आहेत. कोकणातून घाटमार्गे देशावर जात-येतांना विश्रांतीचे स्थान म्हणुन हया लेण्यांचा उपयोग केला गेला. त्याचबरोबर बौद्ध भिक्षूंच्या भदन्त, आचार्य, परित्राजक यांच्या निवार्‍यासाठी सुद्धा या लेण्यांचा उपयोग इ.स. 5 व्या शतकापर्यंत करण्यात आला आहे.

Raigad caves
Raigad caves

या लेण्या अतिशय प्राचिन असुन एैतिहासिक दृष्ट्या खुप महत्वाच्या आहेत. त्यामुळे पुरातत्व खात्याने वेळीच या लेण्यांची डागडुजी व देखभाल करणे गरजेचे आहे. येथे येणार्‍या पर्यटकांनी लेण्यांवर नावे टाकुन येथील सौदर्याला गालबोट न लावता, येथिल परिसर साफ व संरक्षित कसा राहिल याची दक्षता घेतली पाहीजे. असे आवाहन बौद्ध समाज युवा संघ रायगड व महा परिवर्तन वादी पत्रकार संघाच्या पदाधिकारी, सभासद यांनी केले आहे.

ठाणाळे लेण्यांपर्यंत कसे पोहचाल ?

     पालीपासुन ठाणाळे हे गाव 15 किमी अंतरावर आहे. ठाणाळे या गावी येण्यासाठी नाडसुरपर्यंत एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. नाडसुर ते ठाणाळे हे 2 कि.मी. अंतर असून तेवढेच अंतर लेण्याकडे जाण्यासाठी चालावे लागते. ठाणाळे गावच्या पुर्वेकडे असलेल्या जंगलामध्ये ही लेणी आहेत. त्या भागाला चिवरदांड असे म्हणतात. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही येथे आश्रय घेतला होता.

नेणवली व चांभार लेणी

      खडसांबळे व नेणवली गावाजवळ सह्याद्री पर्वतात नेणवली लेण्या आहेत. लेण्याचा मार्ग या दोन्ही गावापासून खरबाच्या वाटेने घनदाट अशा लेण्या डोंगरांमध्ये जातो लेणी गावापासून साधारण अडीच किमी अंतरावर आहेत व येथील जंगल राखीव वनक्षेत्र आहे. अतिशय दुर्गम असलेल्या या लेणी समूहात एकूण 21 लेण्या आहेत. काही लोक पूर्वापार या लेण्यांना पांडवलेणी म्हणूनच संभवतात.

      लेण्यांतील सर्वात मोठ्या सभागृहाच्या मागच्या बाजूस उंच व मोठा घुमट आहे. घुमट दगडांमध्ये व्यवस्थित कोरला आहे. घुमटचा व्यास 1.5 मीटर उंची 3.5 मीटर आहे. घुमटाच्या अगदी वर मध्यभागी झाकणासारखा आकार असून चौरसाकृती छिद्र आहे. स्थानिक लोक या घुमटाला रांजण म्हणतात. या लेण्यातील सभागृहे सर्वात मोठे लेणे आहे. याचा दर्शनी भाग कोसळला असला तरी छत सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो. हे सभागृह 21 मीटर बाय 16 मीटर एवढे विशाल आयताकृती आहे. या सभागृहाचे डाव्या बाजूस व मागील भिंतीत एकूण 17 खोल्या खोदलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत दगडी ओटा आणि चौकोनी खिडकी आहे. काही खोल्या एकांतवासासाठी खोदल्या आहेत. सभागृहांमध्ये ठाणाळे लेण्यांप्रमाणे नक्षीकाम नाही किंवा लेण्यांचा काळ ठरवण्यासाठी शिलालेख नाही. सभागृहाच्या पुढील बाजूस पाणी साठवण्याचे बंदिस्त टाके आहे. लेण्यांमध्ये काही ठिकाणी भिंतीस लागून शयन कोठे बांधले आहेत. व भिंतींमध्ये कोनाडे ठेवण्यात आले आहे. लेणी समूहात एकूण अकरा लेणी असली तरी मुख्य सभागृह व त्याच्या बाजूकडील सदनिका वगळता काही ठिकाणी लेणी कोसळली आहेत. याच लेण्यांच्या पश्चिम बाजूस अर्धा किलोमीटर अंतरावर चांभार लेणी आहेत. परंतु येथील डोंगराचे कडे तुटल्याने येथे जाता येत नाही. या लेणी समूहाचा उपयोग चौल बंदरातून नागोठणे मार्गे मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गासाठी केलेला आहे. ही प्राचीन लेणी 1889 पर्यंत जगात अपरिचित होती परंतु 1890 मध्ये रेव्हरंड ऍबंट यांनी लेण्यांचा प्रथम शोध लावला. तेव्हा पासून या लेण्यांची काहीही दुरुस्ती झालेली नाही. प्रतिकूल निसर्ग परिस्थिती व मानवी देखभालीची उदासीनता यामुळे लेण्यांचा हा सांस्कृतिक ठेवा यापुढे आणखी किती काळ आपले अस्तित्व टिकवून ठेवेल याबाबत शंका आहे.

नेणवली लेण्यांपर्यंत कसे पोहोचाल ?

     पालीपासुन नेणवली व खडसांबळे हे गाव साधारण 15-16 किमी अंतरावर आहे. खडसांबळे गावी येण्यासाठी पालीवरून एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे. खडसांबळे ते लेणी चालत पार करावे लागते.

गोमाशी लेणी

     गोमाशी येथे बौद्ध लेणी समूह आहे. त्याला काही लोक भृगु ऋषींचे लेणी देखील संबोधतात. गोमाशी गावाजवळ सरस्वती नदीकाठी खोंडा नावाचा डोंगर आह. या डोंगरातील एका घळीत घळईत 1.5 मीटर उंचीची गौतम बुद्धांची प्रतिमा कोरण्यात आली आहे. कोणी याला भृगु ऋषींची मूर्ती म्हणते. हे ठिकाण म्हणजे नागोठणे खाडीमार्गे ताम्हणी घाटात मावळात जाणाऱ्या मार्गावरील एक लेणे आहे. या लेण्यांकडे जायचे असेल तर पाली पासून गोमाशी अंतर 14 किमी आहे. गोमाशी गावापर्यंत एसटीची सोय आहे. या लेण्यांमध्ये देखील मोठी पडझड झाली आहे. लेण्यांपर्यंत जाणाऱ्या मार्गाची देखील दुरवस्था झाली आहे.

जोपासण्याची गरज

      येथिल स्तुप, विहार, चैत्यगृह, शिलालेख स्मारक यांची मोठया प्रमाणात पडझड झाली असुन त्यावर अनेक उपद्रवी लोकांनी चक्क ऑईल पेन्टने नावे लिहीली आहेत. त्यामुळे हि ऐंतिहासिक व इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या या वास्तु नामषेश होण्याची भिती आहे. प्राचीन इतिहासाची साक्ष देणारा हा मौलिक ठेवा जोपासण्याची नितांत गरज आहे. अनेक देश विदेशातील पर्यटक व बौद्ध अभ्यासक इथे भेट देत असतात. पर्यटकांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी पर्यटन वाढीला देखील खूप संधी आहे. तसेच हौशी पर्यटकांनी येथील वास्तूला विद्रुप किंवा हानी करू नये.

SSC Result 2024 I दहावी निकाल रायगड जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

: मुंबई विभागात रायगड जिल्ह्याची बाजी
: मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त
: मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले

रायगड :धम्मशील सावंत

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल‌ सोमवारी (दि.२७) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.८७ टक्के इतके आहे. तसेच मुंबई विभागात रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. मुंबई विभागात एकूण ९५.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल सोमवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ७२७ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले.‌ यामधील ३४ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार १५९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.७५ टक्के इतके आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी दहावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ९५.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
…………………
५४.३५ टक्के पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण

रायगड जिल्ह्यातील ५४७ पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील ५३९ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. त्यापैकी २९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५४.३५ टक्के इतके आहे.
…………………

Riya Gaikwad I रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार

लातूर-(विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड,लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक विजयकुमार बळीराम गायकवाड यांची सुपुत्री रिया विजयकुमार गायकवाड यांची बफेलो यूनिवर्सिटी ऑनर्स स्टूडेंट काऊन्सिल च्या २४-२५ च्या कालावधी साठी अध्यक्ष म्हणून विजयी होऊन निवड झाल्याबद्दल रिया आणि तिचे आई वडिल पल्लवी आणि विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहारात बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला.

Riya Vijaykumar Gaikwad
Riya Vijaykumar Gaikwad

पूज्यनीय भंते पाय्यानंद यांनी रियाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रिया नी आपल्या मनोगत व्यक्त केले.ती म्हणाली की परमपूज्यनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळेच मी अमेरिकेला शिक्षणासाठी जाऊ शकले.माझ्या कुटुंबांनी मला सपोर्ट करुन पाठवले म्हणून हे शक्य झाले.आपण ही आपल्या पाल्याना उच्च शिक्षणासाठी देशात आणि परदेशात पाठवावे असे मत रिया नी व्यक्त केले.

कार्यक्रमाला अखिलभारतीय भिक्कू संघाचे कार्याध्यक्ष पुज्यनीय भंते डॉ उपगुप्त थेरो,पुज्यनीय भंते पाय्यानंद,,पुज्यनीय भिक्कू संघ,पांडुरंग अंबुलगेकर,प्राचार्य डॉ गवई,हजारोच्या संख्येनी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

Raigad I जनतेशी नम्र आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं की झपाट्याने प्रगती होते हे धीरज गुप्ता ने दाखवून दिले : प्रकाशभाऊ देसाई यांचे कौतुकोदगार

पालीत तरुण उद्योजक धीरज गुप्ता यांच्या डी. जी मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न

शिवसेना नेते प्रकाशभाऊ देसाई,अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या शुभहस्ते फीत कापून उदघाट्न

पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत )महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली (सुधागड) येथे पाली बाजारपेठेत डी. जी. मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न करण्यात आले. प्रॉपरायटर धीरज गुप्ता, अक्षय गुप्ता यांच्या अतिशय देखण्या आणी भव्य शोरूमचे उदघाट्न शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई, सौ. अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

पाली येथे असलेले डी जी मोबाईल शॉप ने आपली विश्वासाहर्ता कायम टिकवून ठेवली आहे. जनतेला योग्य आणी समाधानकारक सुविधा देण्यात ते यशस्वी ठरले. जनतेचे भरभरून मिळणारे सहकार्य, विश्वास आणी प्रेम यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे, मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांच्या सेवेसाठी योग्य माफक दरात, आणी सवलती च्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Raigad

शोरूमचे उदघाटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रकाशभाऊ देसाई म्हणाले की मागील चार पाच वर्षात पाली तील तरुण धीरज ने व्यवसायातून जनतेशी आपली नाळ जोडून चांगला व्यवसाय उभा केला. जनतेशी नम्र,आणी व्यवसायाशी प्रामाणिक राहील की झपाट्याने प्रगती होते हे धीरज गुप्ता ने दाखवून दिले असल्याचे प्रकाशभाऊ देसाई यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले.

तरुणांनी उद्योग व्यवसायात उतरून आपलं अस्तित्व निर्माण केल पाहिजे. नोकरीं मागणाऱ्या पेक्षा नोकरीं देण्याची क्षमता स्वतःमध्ये तयार करावी. धीरज गुप्ता, अक्षय गुप्ता यांची दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशा शब्दात देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. शोरूम चे मालक धीरज गुप्ता यांनी सांगितले की सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील नागरिकांना अध्ययावत व तंत्रयुक्त मोबाईल, इलेक्ट्रीकलं साहित्य जलद आणी स्वस्त दरात मिळावे यासाठी हे शोरूम उपयुक्त ठरेल.

आता आपल्या मनातील मोबाईल, इतर इलेक्ट्रिकल साहित्य घेण्यासाठी पनवेल,मुंबई,ठाणे, पुणे इतर शहरी भागात जाण्याची आवश्यकता नसून पाली येथे सर्व अत्याधुनिक, दर्जेदार साहित्य मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शोरूम ला भेट द्यावी, आपल्याला समाधानकारक सेवा दिली जाईल असे धीरज गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान शोरूम च्या उदघाटना निमित्त ग्राहकांना भेट वस्तू, लकी ड्रॉ ची बक्षिसे देण्यात आली.

या नवीन शोरूम ला आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई,शिवसेना उ.बा.ठा चे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, रवीशेठ देशमुख, सुरेशशेठ खैरे, राजेंद्र राऊत, नगराध्यक्षा प्रणालीताई शेळके, नगरसेवक सुलतान बेनसेकर,सचिन जवके, संकेत दपके, सिद्धेश दंत, ओमकार खोडागळे, विनीत कर्णिक, अर्जुन हुले तसेच विविध राजकीय, सामाजिक, शासकीय, धार्मिक सेवाभावी क्षेत्रातील मान्यवर, पाली मधील प्रतिष्ठित व्यापारी आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात.

कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात.

 

अनधिकृत शिक्षण संस्थेवर कारवाईची पालकांकडून मागणी

 

कुलदीप मोहिते कराड

 

शिक्षणाचे महत्त्व समाजात वाढत असले तरी त्याचा फायदा घेत अनेक बोगस शिक्षण संस्था, अकॅडमी उदयाला येऊन शिक्षणाचे बाजारीकरण सध्या होत आहे . त्यामुळे स्पर्धेच्या युगात पुढील पिढी घडवण्यास खीळ बसेल,, विद्यापीठ कायद्यात अनेक उणिवा असून, त्या दूर करून विद्यार्थी हिताची जपणूक होणे गरजेचे आहे . सुशिक्षित बेरोजगारांच्या टोळ्या निर्माण होणे ही शिक्षण क्षेत्रातील मोठी समस्या सध्या. बनत चालली आहे.

 

.. आज-काल शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढल्यामुळे अनेक पालकांना आपलं पाल्य स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पालक त्याला खाजगी कोचिंग क्लासेस ला ऍडमिशन घेतात. परंतु त्याची जय्यत तयारी करून त्याला मार्क वाढवून देतो असे आश्वासन देऊन काही अकॅडमीचे मालक शिक्षक पालकांना आश्वासन देतात परंतु त्या पद्धतीचा निकाल बारावीला लागत नसल्यामुळे पालक व अकॅडमी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. दहावी अकरावी बारावी या वर्गात विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो एक्स्ट्रा मार्क मार्क मिळवून देतो असे सांगून पालकांच्याकडून ज्यादा पैसे अकॅडमी वाले घेतात परंतु बारावीत मुले गुणवंत यादीत आली नसल्यामुळे पालकांनी दिलेल्या आर्थिक व्यवहारामुळे पालक व अकॅडमी शिक्षक यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. 

 

असाच प्रकार विद्यानगर कराड येथे सुरू आहे मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बोगस शिक्षण संस्थेचे जाळे येथे आहे. बोगस शिक्षण संस्था चालकांनी शासनाच्या शिक्षण विभागाकडील आशीर्वाद व डोळे झाक वृत्तीचा फायदा घेऊन स्वतःच्या अनाधिकृत शिक्षण संस्थेला अकॅडमी असे गोंडस नाव देऊन सरळ सरळ पालक शासन आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करीत असल्याचे चित्र आहे . मुळामध्ये अनधिकृत अकॅडमी ला कोणत्याही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करता येत नाही त्यामुळे ॲकॅडमी चालक आणि शिक्षण संस्था चालकांनी शकल लढवून संधन मताने अर्थकारण साधण्यासाठी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी अकॅडमी कडे वर्ग केल्याची चित्र आहे. आपण दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे पालकांमध्ये असंतोष आहे कराड तालुक्यातील विद्यानगर येथे सुमारे 70 ते 80 खाजगी अकॅडमी आहेत पालकांकडून लाखो रुपये त्यांनी घेतले आहेत आहे परंतु बारावीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची गुण कमी झाले आहेत त्यामुळे पालकांनी स्वयंभूत शिक्षकांची धुलाई केली आहे शिक्षण क्षेत्र ज्ञानाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये खाजगी अकॅडमीच्या नावाखाली गोरख धंदा सुरू आहे असा आरोप सुरू झाला आहे अशा अकॅडमी पासून पालकांनी सावध राहून आपल्या मुलाला योग्य कॉलेजला प्रवेश घ्यावा शिक्षण विभागाने अशा बोगस अकॅडमी वर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे .नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खाजगी शिकवणीत बंदी व नियंत्रण आणण्यात आले आहे आता अकरावी बारावी दहावी अकॅडमी घेणाऱ्या खाजगी बोगस शिक्षकांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

अनाधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमीवर कारवाई होण्यासाठी शिक्षण संचालकांच्या खास पथकाने छापेमारी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातयं” या म्हणी सारखा प्रकार होणार आहे