ठाणे : आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने विटावा परिसरातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मंगल प्रभात, शंकर मंदिर तलावाजवळ, सूर्यनगर, विटावा, कळवा येथे होणार आहे.
आयोजकांनी सलग चौथ्या वर्षी लोणंद-सातारा पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांना आरोग्यसेवा दिल्यानंतर आता ही सेवा विटावा परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. “वारी पंढरीची… सेवा आरोग्याची!” या संकल्पनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये पहिल्या ५० रुग्णांना चार दिवसांचे मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क : ९९३०५ ९११५५ / ७०३९६ ७३९१५
