Nilesh Sambare Jijau Sanstha Mumbai Police

दोन सख्ख्या बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड । चिंचवली गावात मोठा जल्लोष | Nilesh Sambare

जिजाऊ मोफत UPSC/MPSC वाचनालय व मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, वासिंदच्या विद्यार्थिनी असलेल्या सख्ख्या बहिणी कु. शैला संतोष घोडविंदे आणि कु. चित्रा संतोष घोडविंदे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा व मिरवणुकीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे.

या कार्यक्रमास चिंचवली ग्रामस्थ, जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
या सख्ख्या बहिणींनी मिळवलेल्या यशामुळे त्यांच्या कुटुंबात जो आनंद निर्माण झाला आहे, तोच आनंद या परिसरातील गावागावांमध्ये निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे. ग्रामीण भागातील अधिकाधिक तरुण-तरुणींना शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी करून त्यांच्या आयुष्यातही असेच आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी जिजाऊ संस्था सातत्याने कार्यरत आहे, असे गौरवोद्गार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे प्रमुख निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *