ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत श्री. निलेश सांबरे यांनी आपल्या नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सहकार क्षेत्रात आपला भक्कम जनाधार असल्याचे दाखवून दिले.
विक्रमगड तालुक्यात सेवा संस्था मतदारसंघातून श्री. निलेश सांबरे यांनी दणदणीत विजय संपादन केला. तसेच जिल्हास्तरीय ओबीसी राखीव मतदारसंघात प्रस्थापितांच्या बलाढ्य पॅनेलविरुद्ध अत्यंत अटीतटीची लढत देत अवघ्या १०० मतांचेच अंतर राहिले. या निकालाने प्रस्थापितांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण झाल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.

विशेष म्हणजे, ज्या प्रस्थापितांनी श्री. निलेश सांबरे यांना आपल्या पॅनेलमध्ये स्थान देण्यास नकार दिला होता, त्याच प्रस्थापितांना या निवडणुकीत श्री. निलेश सांबरे यांच्या जनाधाराची आणि प्रभावाची प्रचिती आली. कोणत्याही पॅनेलचा आधार नसतानाही त्यांनी उभा केलेला जनसमर्थनाचा लाट हा त्यांच्या नेतृत्वावरील सभासदांच्या विश्वासाचा स्पष्ट पुरावा ठरला.
गेली २० वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सहकार क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्यामुळे श्री. निलेश सांबरे हे आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. या निवडणुकीने त्यांचा वाढता प्रभाव आणि सर्वसामान्य सभासदांमधील स्वीकार अधिक ठळकपणे अधोरेखित केला आहे.

या निकालानंतर निलेश सांबरे यांनी सर्व सभासद, मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितले,
“हा सामाजिक कामावर असलेला जनतेचा विश्वासाचा विजय आहे. सभासदांनी आमच्या कामावर दाखवलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शक, प्रामाणिक आणि सभासदहिताचे काम यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील.”
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे श्री. निलेश सांबरे हे केवळ एक उमेदवार नसून सहकार क्षेत्रातील प्रभावी, जनाधार असलेले आणि प्रस्थापितांना थेट आव्हान देणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत.
