Best Gold Shops in Dubai
Best Gold Shops in Dubai

दुबई मधून भारतात Gold आणण्यासंदर्भात नवी नियमावली | UAE-INDIA GOLD LIMIT ALL DETAILS

जगात सध्या सर्वात मौल्यवान धातू म्हणून सोनं (Gold) ओळखलं जातं. अगदी सुरूवातीपासूनच सोन्याच्या किमती या प्रत्येक देशागणिक वेगवेगळ्या असतात. मात्र, गोल्ड सिटी अशी ओळख असलेलं दुबई हे नेहमीच सोन्याची आवड असलेले आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे.

दुबई दरवर्षी दक्षिण अफ्रिकेकडून (Gold South Africa) मोठ्या प्रमाणावर कच्च सोनं विकत घेऊन त्याला शुद्ध करून मोठ्या प्रमाणावर विक्री करतं.

जगाच्या पाठीवर सर्वात कमी किमतीत सोनं हे दुबईमध्ये मिळत असल्याची शक्यता वर्तवली जाते. दुबईमध्ये काम करणाऱ्यांपैकी सर्वाधिक मनुष्यबळ हे भारतीय आहे. दुबईत राहणाऱ्या आशियाई लोकांपैकी ५० टक्के लोकं हे भारतीय आहेत. त्यामुळं या भारतीय लोकांकडून सोन्याची अधिक खरेदी करण्याची शक्यता असते. मात्र, आता या शक्यतेवर Central Board of Indirect Taxes and Customs ने नियंत्रण आणलंय

दुबईतील भारतीय लोकं सोनं विकत घेऊ शकतात मात्र, ते या नव्या नियमावलीच्या अनुसारच. दुबईतून भारतात सोनं आणायचं असेल तर Central Board of Indirect Taxes and Customs ने काही नियम जारी केले आहेत. दुबई शिवाय कुठल्याही अमिराती देशातून कुणी सोनं आणत असेल तर त्यालाही हे नियम लागू असतील.

स्त्री-पुरूष असाल तर किती सोनं आणू शकता ?

दुबईतून सोनं आणण्यासाठी तुम्ही स्त्री आहात की पुरूष हे देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही पुरूष असाल तर जास्तीत-जास्त २० ग्रॅम तर महिलांसाठी ४० ग्रॅम पर्यंतची मर्यादा ठरविण्यात आली आहे. तर जास्तीत-जास्त या सोन्याची किंमत १ लाख रूपयांपेक्षा अधिक नसावी. यासोबतच duty free limit ही केवळ सोन्याच्या दागिण्यांवरच लागू असेल.

आता तुम्ही जर दुबईत ६ महिने देखील वास्तव्य केलं नसेल आणि तुम्हांला तिथून भारतात सोनं आणायचं असेल तर तुम्हांला ३६.०५ टक्के अतिरिक्त कस्टम टॅक्स द्यावा लागेल. UAE Embassy च्या म्हणण्यानुसार युएई मधून भारतात येणारे प्रवासी १० किलो पेक्षा अधिक सोनं आणू शकत नाही तसेच त्यावर कस्टम आणि अन्य चार्जेस लागतील.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *