खंडाळा : अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली असून “मिसिंग लिंक” या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून जगातील सर्वात रुंद बोगदा निर्माण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा मान मिळाला आहे. या अभूतपूर्व यशामागे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अभियांत्रिकी कौशल्य निर्णायक ठरले आहे. […]
