Venutai Chavhan I सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

 

कुलदीप मोहिते कराड

कराड: (दि. 30 मे, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड  व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त “स्व. यशवंतरावजी व सौ. वेणूताई चव्हाण: सहजीवनाचा आदर्श” या विषयावर शनिवार, दि. १ जून २०२४ रोजी प्रमुख पाहुणे . बी. एन. कालेकर(माजी प्राचार्य वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून . अल्ताफ हुसेन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री. शिवाजी शिक्षण संस्था,कराडचे उच्च शिक्षण मंडळ) हे असणार आहेत. तसेच प्रनुख उपस्थिती म्हणून . अरुण पांडुरंग पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे उच्च शिक्षण मंडळ) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी कराड परिसरातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन वेणूताई चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य मा. प्रा. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *